"माझे विवाहित मित्र मला सगळ्यांसमोर...", 'तारक मेहता'मधल्या बबिताने केला होता धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 21:43 IST2023-10-18T21:29:19+5:302023-10-18T21:43:56+5:30

बबिताच्या फिटनेस अन् सौंदर्याची तरूणाईमध्येही क्रेझ

Babita - Munmun Dutta : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta ka Ooltah Chashma) मालिकेतील बबिता हे लोकप्रिय पात्र अभिनेत्री मूनमून दत्ताने घराघरात पोहोचवलं

बबिता या ग्लॅमरस भूमिकेमुळे मूनमून दत्ताला देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिला अनेक जण खऱ्या नावापेक्षाही बबिता नावानेच ओळखतात

मूनमूनचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यात तिचे काही विवाहित पुरूष मित्रमंडळी देखील आहेतच. त्यांच्याबद्दलची एक महत्त्वाची तिने सांगितली होती

मूनमन दत्ताने एका मुलाखतीत खुलासा केला होता की तिचे अनेक चाहते हे विवाहित आहेत. त्यातही काही चाहते हे तर तिचे विवाहित मित्रच आहेत

आजही मूनमून म्हणजेच बबिताचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्यात विवाहित मंडळी तर आहेतच, पण तरूण आणि तरूणीही तिच्या फिटनेसचे फॅन आहेत

या विवाहित मित्रांबद्दल बोलतान मूनमून म्हणाली होती की, माझे लग्न झालेले मित्र मला सगळ्यांसमोर म्हणत असतात की मी त्यांची क्रश आहे

मी मात्र त्यावर केवळ, 'ठीक आहे', असं उत्तर देते आणि विषय बदलून टाकते, असंही मूनमून दत्ताने सांगितलं होतं.