मालिकेत सोज्वळ दिसणारी अनुपमा' खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 06:23 PM2022-04-01T18:23:25+5:302022-04-01T18:52:21+5:30

टीव्ही शो 'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली लोकांची आवडती अभिनेत्री बनली असून तिला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

शोमध्ये साडीत दिसणारी रुपाली गांगुली खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे, ती तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

रुपालीने नुकतेच एक फोटोशूट केले आहे, ज्यामध्ये ती एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

रूपालीला तुम्ही याआधी साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत पाहिलं असेल. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही ती सहभागी झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)

पहिल्या चार वर्षात रुपाली गांगुलीने पाच मालिकांमध्ये काम केले. मात्र यापैकी एकही मालिका सहा महिने देखील चालली नाही. दरम्यान साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली आणि तिच्या करियरला कलाटणी मिळाली.(फोटो: इंस्टाग्राम)

रुपाली गांगुलीने २००० साली सुकन्या या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली या मालिकांमध्ये काम केले.