Ankita Lokhande : "आमचं नातं आणखी जास्त..."; घटस्फोटाच्या मुद्द्यावर अंकिता लोखंडेने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 12:48 PM2024-02-08T12:48:20+5:302024-02-08T13:18:58+5:30

Ankita Lokhande : अंकिताने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत घटस्फोटाबद्दल स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.

बिग बॉस 17 च्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैन यांच्यात जोरदार वाद झाले. या जोडीने त्यांच्या भांडणाच्या वेळी एकमेकांना बरंच काही काही म्हटलं आहे. त्याचवेळी नाराज झालेल्या अंकिताने विकी जैनबाबच टोकाची भूमिका घेतली. ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

बिग बॉस या शोनंतर अभिनेत्री लगेचच आपल्या पतीला सोडणार का? अशी चर्चा जोरदार रंगली होती. मात्र आता अंकिताने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत घटस्फोटाबद्दल स्पष्टपणे उत्तर दिलं आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अंकिता लोखंडेने बिग बॉसच्या घरात राहताना विकी जैनला घटस्फोट देण्याच्या आपल्या कमेंटबद्दल सांगितलं. विकीपासून वेगळं होण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचं तिने स्पष्ट केलं.

"मी समजूतदार नाही आणि जेव्हा मी कॅमेरासमोर असते तेव्हा मला जास्त समजूतदार असल्याची गरज आहे. मी जे बोलते त्याबद्दल सेंन्सिबल असणं आवश्यक आहे. मी अजूनही शिकत आहे."

दोघांमधील नातं आता अधिक घट्ट झाल्याचंही अभिनेत्रीने सांगितले. अंकिता म्हणाली, "वर्षानुवर्षांच्या मैत्रीनंतर आमचं लग्न झालं आहे. आम्ही फक्त गोष्टी (मस्करीत) बोलतो आणि ते गांभीर्याने घेतलं जातं."

"जर आमचं नातं इतकं घट्ट नसतं तर कदाचित आमच्यात भांडणंही झाली नसती. फरक एवढाच आहे की, आमची मारामारी टीव्हीवर झाली, जी इतर सामान्य जोडप्यांच्या बाबतीत होऊ शकत नाही. पण या सगळ्यामुळे आमचं नातं आणखी घट्ट झालं आहे."

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अंकिताने बिग बॉस 17 चा तिच्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम झाला हे देखील सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, "मला असं वाटतं की मी यावर मात करणं आवश्यक आहे कारण याचा माझ्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे."

"मी कधीच जास्त विचार करणारी नव्हती पण परिस्थिती अशी होती की मी ओव्हर थिंकर बनले आहे. मी यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या आयुष्यात काय घडलं आहे याबद्दल काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यास वेळ लागेल पण शेवटी मी त्यातून बाहेर येईन."

बिग बॉसच्या या सीझनमध्ये अंकिता लोखंडे आणि तिचा नवरा विकी जैनचीच सर्वात जास्त जोरदार चर्चा रंगली होती. अंकिता लोखंडे या शोची थर्ड रनर अप ठरली. मुनव्वर फारुकीने बिग बॉस 17 ची ट्रॉफी जिंकली आहे.