Photos: अंकिता लोखंडेच्या घरीही थाटात झालं गौरी आगमन, पारंपरिक लूकमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 16:13 IST2024-09-11T16:01:00+5:302024-09-11T16:13:06+5:30
अंकिता नेहमीप्रमाणेच पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसत आहे.

सध्या सगळीकडे गणेशोत्सव थाटात साजरा होत आहे. काल घरोघरी गौरीचंही आगमन झालं. सेलिब्रिटींच्या घरीही गौरी गणपती साजरा होत आहे. नुकतंच अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिच्या घरच्या गौरीची झलक दाखवली आहे.
अंकिता लोखंडे महाराष्ट्रीयन कुटुंबातूनच येते. पारंपरिक पद्धतीने ती सर्व सण साजरे करते. अंकिता आणि विकीच्या घरीही गौरी गणपती साजरा होत आहे. आज झालेल्या गौरी पूजनाचे काही फोटो तिने शेअर केले आहेत.
अंकिताच्या फॅशनचं तर नेहमीच कौतुक होतं. यातही ती जांभळ्या साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. त्यावर घातलेले साजेसे दागिने तिच्या सौंदर्यात भर पाडत आहेत.
अंकिताच्या जोडीला विकीही तितक्याच उत्साहात दिसला. त्यानेही अंकितासोबत गौरीची पूजा केली. विकीच्या फॅशनवरही चाहते फिदा झालेत.
अंकिताकडे मुखवट्याच्या महालक्ष्मी बसल्या आहेत. त्यांनी नेसवलेली साडी, हार, सजावट याचीही झलक या फोटोंमधून दिसत आहे.
अंकिताने तिच्या आईसोबतही फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिची आई वंदना लोखंडे यांनी पिवळी साडी नेसली आहे. अंकिताच्या दिवंगत वडिलांच्या फोटोफ्रेमजवळ उभं राहत दोघींनी हा फोटो काढला आहे.
याआधी अंकिताने गणेश मूर्तीचेही फोटो शेअर केले होते. बऱ्याच सेलिब्रिटींनी तिच्या घरी येत दर्शन घेतले. तेव्हाही अंकिता सुंदर नटली होती.