अंकिता लोखंडे-विकी जैनचा 'जॉर्जिया'मध्ये रोमान्स, Photos शेअर करत दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 14:00 IST2024-09-20T13:54:57+5:302024-09-20T14:00:50+5:30
अंकिता आणि विकीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय जोडी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) सध्या त्यांच्या व्हॅकेशन फोटोंमुळे चर्चेत आहे. बिग बॉसनंतर ही जोडी घराघरात पोहोचली.
अंकिता आणि विकी काही महिन्यांपासून 'मास्टर शेफ' या शोमध्ये दिसत आहेत. यातही एकमेकांची चेष्टा करणं, प्रेम दाखवणं यातून दोघांनी प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मन जिंकून घेतलं.
आपल्या लाडक्या सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यात नक्की काय चालू आहे हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. सध्या अंकिता आणि विकी जॉर्जियामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
अंकिताची फॅशन स्टाईल नेहमीच ऑन पॉइंट असते. पांढरा शर्ट, ब्लॅक मिनी स्कर्ट, सनग्लासेस आणि शूज असा अंकिताचा क्लासी लूक आहे. जॉर्जियाच्या टुरिस्ट स्पॉट्सवर तिने फोटोशूट केलंय.
तर विकीही फॅशन बाबतीत काही कमी नाही. अंकितासोबत ट्विनिंग करत त्याने व्हाईट टीशर्ट आणि ब्लॅक ट्राऊजर घातली आहे. दोघंही एकमेकांना सुरेख कॉम्प्लिमेंट करत आहेत.
जॉर्जियामध्ये बोटिंग करताना दोघांचा रोमँटिक अंदाजही दिसत आहे. ज्यामध्ये अंकिता विकीला मिठी मारत असून विकी तिच्या गालावर किस करत आहे.
अंकिता दिवसेंदिवस तरुणच होत चालली आहे. तिचं वय कमी होत आहे अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तिच्या एकंदर स्टाईलने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे.
अंकिताने या फोटोंसोबत खास कॅप्शनही लिहिलं आहे. 'तू + मी + पासपोर्ट = आणि काय हवं'. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनीही 'नजर ना लगे' म्हणत कमेंट्सचा वर्षाव केला आहे.