डॉक्टरांचा हलगर्जीपणा, रक्तस्त्राव अन् १९ किमो! प्रसिद्ध अभिनेत्रीचा स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरशी लढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:17 IST2025-06-16T13:01:26+5:302025-06-16T13:17:13+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीची ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज सुरु असून या अभिनेत्रीने कॅन्सरशी झुंज देताना प्रचंड तणावात आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. कोण आहे ही अभिनेत्री?

अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. हिना खाननंतर आणखी एक अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. ही अभिनेत्री म्हणजे रोझलिन खान.
रोझलिनने सोशल मीडियावर हा खुलासा केला आहे. रोझलिन स्टेज ४ कॅन्सरशी लढा देत आहे. इतकंच नव्हे रोझलिनने १९ किमो केल्या असूनही तिच्या तब्येतीत काही फरक पडत नाही
'जी लेने दो एक पल को', 'धमा चौकडी', 'क्राइम अलर्ट', 'सविता भाभी' यांसारख्या मालिकांमध्ये रोझलिनने अभिनय केला आहे. रोझलिनने कॅन्सरशी लढा देताना तिचा भावुक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे
रोझलिनच्या शरीरावरील किमो पोर्ट आता काढून टाकला आहे. त्यामुळे रोझलिनच्या खांद्यावर निशाण उमटले आहेत. मी लवकरच कमबॅक करने, असा आशावाद रोझलिनने व्यक्त केला आहे.
मी प्रत्येक परिस्थितीमध्ये हसणं शिकले आहे. संपूर्ण बरं होण्यासाठी थोडा वेळ लागेल. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मला रक्तस्त्राव झाला आणि परिस्थिती आणखी बिघडली, असा खुलासा रोझलिनने केला आहे.
रोझलिनने आतापर्यंत १९ किमो केल्या आहेत. यामुळे तिच्या शरीरावर परिणाम झाला आहे. इतकंच नव्हे तर कॅन्सरशी लढा देताना रोझलिनला नैराश्याचा सामना करावा लागला आणि यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता
परंतु आता रोझलिन कॅन्सरचा खंबीरपणे सामना करत आहे. इतकंच नव्हे या कठीण काळात अभिनेत्रीचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रपरिवार तिच्यासोबत आहेत.