कुणीतरी येणार गं! सर्वांची लाडकी अभिनेत्री ३७ व्या वर्षी होणार आई, पांढऱ्या ड्रेसमध्ये केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 12:53 IST2026-03-29T12:43:33+5:302026-03-29T12:53:16+5:30

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री आई होणार आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी या अभिनेत्रीने केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत आहे.

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री आई होणार आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी या अभिनेत्रीने केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत आहे.

ही अभिनेत्री आहे सुरभी ज्योति. 'कूबूल है' आणि 'नागिन' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी ज्योती सध्या तिच्या आयुष्यातील एका नव्या टप्प्याचा आनंद घेत आहे.

सुरभीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा एक सुंदर 'मिनी ड्रेस' परिधान केला आहे. सुरभी या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये सुरभी ज्योतिच्या चेहऱ्यावरील 'प्रेग्नन्सी ग्लो' स्पष्टपणे दिसून येत असून, चाहत्यांनी तिच्या या लूकवर पसंतीची पावती दिली आहे. एकूणच आई होणार असल्याचा आनंद सुरभीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतोय.

सुरभीने हे फोटो शेअर करताच तिचे मित्र-मैत्रिणी आणि सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला आहे. अनिता हसनंदानी, निया शर्मा आणि रिद्धी डोग्रा यांसारख्या तिच्या जवळच्या मैत्रिणींनी कमेंट्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

सुरभी ज्योती आणि तिचा पती सुमित सुरी यांचे लग्न गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमधील एका खाजगी सोहळ्यात झाले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतरच या जोडप्याने आपल्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याची घोषणा केली आहे.

सध्या सुरभी आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. सुरभीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या अभिनयापासून थोडी लांब असून आपल्या गरोदरपणाच्या काळाचा आनंद घेत आहे