ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंचा मुलगाही प्रसिद्ध अभिनेता, 'आई कुठे काय करते'मध्ये केलंय काम
By देवेंद्र जाधव | Updated: July 24, 2025 13:54 IST2025-07-24T13:31:00+5:302025-07-24T13:54:26+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडेंच्या मुलाने आई कुठे काय करते मालिकेत काम केलंय हे फार कमी जणांना ठाऊक असेल. सुलभा यांची सूनही अभिनेत्री आहे

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे आज आपल्यात नसल्यात नसल्या तरीही त्यांनी अभिनय केलेल्या कलाकृती प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत
सुलभा देशपांडेंची पुढची पिढीही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. सुलभा देशपांडेंचा मुलगाही प्रसिद्ध अभिनेता आहे
सुलभा यांच्या मुलाचं नाव आहे निनाद देशपांडे. निनाद देशपांडेंनी आईच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्रात प्रवेश केला
अलीकडेच आपण निनाद यांना आई कुठे काय करते मालिकेत अभिनय करताना पाहिलंय. अनघाच्या वडिलांची भूमिका निनाद यांनी साकारली होती
मालिकेत निनाद आणि अनघा या बाप-लेकीचं नातं सर्वांना चांगलंच आवडलं. या मालिकेमुळे निनाद यांना प्रसिद्धी जरी मिळाली असली तरीही त्यांची आई सुलभा देशपांडे आहेत, हे अनेकांना माहित नसेल
याशिवाय सुलभा देशपांडेंची सूनही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिचं नाव आदिती देशपांडे. आदिती यांना आपण नॉट ऑन्ली मिसेस राऊत, जोगवा अशा सिनेमांमध्ये आणि मराठी मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.
अशाप्रकारे सुलभा देशपांडेंची पुढची पिढीही अभिनय क्षेत्र गाजवत आहे. निनाद देशपांडेंना आपण अलीकडेच सध्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत पाहिलं तर आदिती सध्या दॅट्स द स्पिरिट या नाटकात काम करत आहेत