नाटकाच्या संगीत दिग्दर्शकासोबतच थाटलेला संसार, घटस्फोटामुळे चर्चेत आलेली 'ही' अभिनेत्री कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 14:52 IST2025-09-06T14:36:59+5:302025-09-06T14:52:38+5:30

अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा..., शुभांगी सदावर्तेबद्दल या गोष्टी माहितीयेत का? कोरोना काळात लग्न झाल्यावर नाशिकमध्ये...

गेल्या काही वर्षात घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलं आहे. बॉलिवूडच काय मराठी सिनेइंडस्ट्रीतूनही जोडप्यांचा घटस्फोट कानावर पडत आहे. नुकतंच गायक राहुल देशपांडेने १७ वर्षांचा संसार मोडल्याची बातमी दिली आणि सर्वांनाच धक्का बसला.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक बातमी आली. 'संगीत देवबाभळी' हे नाटक सध्या जोरात आहे. नाटकातील मुख्य अभिनेत्रीचाही घटस्फोट झाल्याचं समोर आलं.

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते जी नाटकात संत तुकारामांच्या पत्नीची आवलीची भूमिका साकारत आहे. तर नाटकाचे संगीतकार आनंद ओक खऱ्या आयुष्यात तिचा नवरा आहे. आनंक ओक यांनीच शुभांगी आणि मी घटस्फोट घेतला असल्याची पोस्ट केली.

घटस्फोटामुळे चर्चेत आली शुभांगी सदावर्ते (Shubhangi Sadavarte) आहे तरी कोण? तर शुभांगी ही मुळची नाशिकची आहे. तिला गायनाची आवड होती. त्यातच तिला करिअरही करायचं होतं.

शुभांगी कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. तेव्हाच तिला 'संगीत देवबाभळी' नाटकाची ऑफर आली. हे तिचं पहिलंच व्यावसायिक नाटक होतं. हे नाटक तिच्या करिअरमध्ये महत्वाचा टप्पा ठरलं.

त्यानंतर २०१५ साली आलेल्या 'लक्ष्य' मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. 'महाराष्ट्र शाहीर' सिनेमात ती दिसली होती. तसंच 'पुन्हा कर्तव्य आहे','बालपण देगा देवा','साजणा' या मालिकांमध्येही तिने काम केलं होतं.

शुभांगीने २०२० साली संगीतकार आनंद ओक यांच्याशी लग्न केलं. नंतर तेव्हा कोरोनामुळे लॉकडाऊन झालं. त्यांच्यासाठी तो काळ कठीण होता. त्यांनी नाशिकमध्येच फुड स्टॉल सुरु केला.

'संगीत देवबाभळी' हे नाटक प्राजक्त देशमुखने लिहिलं आहे आणि दिग्दर्शितही केलं आहे. यातील संगीत, गाणी हा तर महत्वाचा भाग आहे. दोन्ही अभिनेत्री लाईव्ह ही गाणी सादर करत असतात. तर आनदं ओक यांनीच याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

शुभांगी आणि आनंद ओक यांनी लग्नानंतर चारच वर्षात घटस्फोट घेतल्याने सर्वांना धक्काच बसला आहे. २०२१ मध्ये शुभांगीच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने प्रयोग सादर केला होता. शो मस्ट गो ऑन अशी तिच्या वडिलांचीच इच्छा होती.