अभिनेत्री शिवांगी जोशी शिवभक्तीत तल्लीन; घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 18:52 IST2024-04-22T18:34:55+5:302024-04-22T18:52:40+5:30

शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून ती घराघरांत पोहोचली.
शिवांगी ही सोशल मीडियावर सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो हे नेहमीच शेअर करत असते.
नुकतेच शिवांगी ही भोलेनाथच्या दर्शनासाठी वाराणसीला पोहोचली.
अभिनेत्रीने बाबा विश्वनाथ मंदिरातील अनेक फोटो शेअर केली आहेत.
शिवांगी महादेवाच्या भक्तीत तल्लीन झालेली दिसून आली.
शिवांगीनं पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. गळ्यात झेंडूच्या फुलांची माळ आणि कपाळावर टिळक असलेली शिवांगी खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने एकामागून एक अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप आनंदी दिसत आहे.
शिवांगी जोशी ही 'बरसातें: मौसम प्यार का' मध्ये दिसली होती. या शोमध्ये शिवांगीसोबत कुशल टंडन आणि सिंबा नागपाल देखील होते.
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.