"मी घरातच हिंसा पाहिली आहे...", आईवडिलांच्या घटस्फोटावर मुस्लिम अभिनेत्रीचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:06 IST2025-05-14T16:53:12+5:302025-05-14T17:06:18+5:30
अभिनेत्रीच्या बालपणावर झाला परिणाम, सतत घाबरुन असायची अन्...

'ये रिश्ता क्या कहलाता है', तुझसे है राब्ता','ना बोले तुम ना मैने कुछ कहा' अशा मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री रीम शेख (Reem Shaikh). केवळ २२ वर्षांच्या या अभिनेत्रीने फार कमी वयात टेलिव्हिजनविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रीम शेख सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. 'लाफ्टर शेफ' या रिएलिटी शोमध्येही ती दिसली होती. यामध्ये तिला दुखापतीचाही सामना करावा लागला होता.
रीम शेखचं बालपण खूप वेदनादायी होतं. तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आहे. याबद्दल तिने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.
रीम म्हणाली,"माझे आईवडील विभक्त झाले आहेत. ४ वर्षांपूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला. माझी एक सावत्र बहीणही आहे. सोशल मीडियावर ही खूप मोठी मिस्ट्री होती जी मी दूर करते."
"बरेच लोक मला विचारतात की माझ्यासोबत दिसणारी ही मुलगी कोण? तर ही माझी सावत्र बहीण आहे हे खरं आहे. ती एअर हॉस्टेस आहे आणि बहिणीपेक्षाही माझ्यासाठी खूप काही आहे."
"लोक मलाच नाही तर माझ्या आईलाही विनाकारण ट्रोल करतात. ते माझ्या आईला म्हणतात की तुम्ही रीमचे कपडे का घातले आहेत? तुम्हाला लाज नाही वाटत का? असं म्हणतात. आम्ही एकमेकींचे कपडे घालू शकत नाही का?"
बालपणीबद्दल रीम म्हणाली,"मी लहानपणी सतत घाबरलेले असायचे. मला लोक आगाऊ समजायचे. पण आमच्या घरातलं वातावरण बघून मी तशी बनले होते. मी घरीच हिंसा पाहिली आहे. घरीच असं वातावरण असेल तर आपल्यासाठी आणखी कुठली सुरक्षित जागाच नसते."
"म्हणून मी अशी मुलगी बनले. मी प्रत्येकाला घाबरुन राहायचे. कोणाशीही बोलायला मला हिंमत लागायची."