मानलेल्या भावासोबतच अभिनेत्री लिव्ह इन मध्ये? पतीनेच केले गंभीर आरोप; ९ वर्षांनी तुटलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:47 IST2025-01-27T13:33:03+5:302025-01-27T13:47:30+5:30

लोकप्रिय अभिनेत्याने पत्नीवर केलेले गंभीर आरोप, तर पत्नीनेही...

'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आठवतोय? नैतिक या भूमिकेत तो दिसला. त्याच्या गोड चेहऱ्याने आणि अभिनयाने सर्वांचंच मन जिंकलं. त्याची आणि हिना खानची जोडी प्रेक्षकांना आवडली होती.

मात्र खऱ्या आयुष्यात करण मेहराचा संसार खूप वाईट नोटवर तुटला होता. पत्नी निशा रावलने त्याच्यावर अनेक आरोप लावले होते. तर नंतर करणनेही निशावर गंभीर आरोप केले.

करण आणि निशाचं २०१२ साली लव्हमॅरेज झालं होतं. 'नच बलिए' या डान्स रिएलिटी शोमध्येही ते सहभागी झाले होते. मात्र लग्नानंतर ९ वर्षांनी २०२१ साली त्यांचं लग्न तुटलं. दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले.

निशाने करणवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप लावले. तर करणने निशावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले. निशा मानलेल्या भावासोबत ज्याला ती राखी बांधायची त्याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहत असल्याचा आरोप करणने लावला.

करण मेहरा मुलाखतीत म्हणाला, "निशा मला माझ्या मुलाला भेटूही देत नाही. ती एका भलत्याच माणसाच्या घरी त्याच्यासोबत राहते. तिचं राखी भाऊ रोहित सातियासोबत अफेअर आहे. आधी ती त्याला भाऊ म्हणायची, त्याला राखी बांधायची. मात्र नंतर त्यांचे अनैतिक संबंध झाले."

करण मेहरा मुलाखतीत म्हणाला, "निशा मला माझ्या मुलाला भेटूही देत नाही. ती एका भलत्याच माणसाच्या घरी त्याच्यासोबत राहते. तिचं राखी भाऊ रोहित सातियासोबत अफेअर आहे. आधी ती त्याला भाऊ म्हणायची, त्याला राखी बांधायची. मात्र नंतर त्यांचे अनैतिक संबंध झाले."

तो पुढे म्हणाला, "माझ्या आणि निशाच्या लग्नात याच रोहितने मानलेला भाऊ म्हणत तिचं कन्यादानही केलं होतं. मला हे गेल्यावर्षीच कळलं होतं पण तेव्हा मी सांगितलं असतं तर माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नसता."

करण आणि निशाचं हे प्रकरण २०२१ मधलं आहे. त्यांना कविश हा ७ वर्षांचा मुलगाही आहे.