Kanishka Soni : स्वत:शी लग्न केलेल्या अभिनेत्रीचा स्वत:शीच घटस्फोट; ३००० मुलं नाकारल्यावर हवाय 'मिस्टर राईट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 18:46 IST2026-02-13T18:36:57+5:302026-02-13T18:46:10+5:30
Kanishka Soni : २०२२ मध्ये कनिष्काने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकित केलं.

'देवों के देव... महादेव', 'महाभारत', 'पवित्र रिश्ता' आणि 'दिया और बाती हम' यांसारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री कनिष्का सोनी काही वर्षांपूर्वीच टीव्ही इंडस्ट्रीला बाय-बाय करून लॉस एंजेलिसमध्ये स्थायिक झाली आहे.

हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये काम करत असल्याचंही सांगितलं होतं. २०२२ मध्ये कनिष्काने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना चकित केलं. त्यावेळी तिने म्हटलं होतं की, तिला कोणाही पुरुषाची गरज नाही आणि ती तिची स्वप्नं स्वतः पूर्ण करू शकते.

आता मात्र कनिष्का स्वतःसाठी पती शोधत असल्याचं समोर आलं आहे. कनिष्काने इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहून तिला नेमका कसा पती हवा आहे, हे स्पष्ट केलं आहे.

कनिष्काने सांगितलं की, तिला असा मुलगा हवा आहे जो पुढील ३-४ महिन्यांत वेस्ट लॉस एंजेलिसमध्ये तिच्याशी लग्न करेल. तो दिसायला अत्यंत हँडसम, क्यूट आणि उंच असावा. त्याला धूम्रपान, हुक्का, ड्रग्ज किंवा दारूचं व्यसन नसावं.

तो शांत स्वभावाचा असावा आणि शिवीगाळ करणारा नसावा. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असावं. तो मांसाहार करणारा नसावा. त्याने माझ्यासोबत निसर्ग आणि अध्यात्मावर लक्ष केंद्रित करावं, माझी जबाबदारी स्वीकारावी आणि मला गोंडस मुलं द्यावीत. आता मला हे ग्लॅमरचं जग मागे सोडून घर आणि शांत अध्यात्मिक जीवन हवं आहे.

कनिष्काने लिहिलं की, "मी खूप इन्ट्रोव्हर्ट आहे, पण माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. माझी इच्छा आहे की कोणीतरी माझ्या आयुष्यात यावं आणि मी किती उत्तम व्यक्ती आहे हे जाणून घ्यावं."

"ज्या प्रकारे मी प्रेम करते आणि ज्या सकारात्मकतेने मी जगाकडे पाहते, ते कोणीतरी अनुभवावं अशी माझी इच्छा आहे. मी हे सर्व गांभीर्याने सांगत आहे. मला माहीत आहे की २०२२ मध्ये मी स्वतःशीच लग्न केलं होतं, आता त्याला ४ वर्षे पूर्ण झाली आहेत."

"आता मी स्वतःशी घटस्फोट घेत आहे. मी कधीही क्लबमध्ये जात नाही, मी सामाजिक कार्यक्रमात फारशी जात नाही. मला घरी राहायला आणि स्वतःसाठी स्वयंपाक करायला फार आवडतं."

"मी किती छान शाकाहारी आणि कांदा-लसूण विरहित जेवण बनवते, हे कोणीतरी समजून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. मी आयुष्यभर एकटीच राहिले, एकटीच फिरले. आता कोणीतरी माझी जबाबदारी उचलावी असं मला वाटतं."

"जोडीदारामध्ये विचारांची सुसंगतता असणे महत्त्वाचे आहे. मॅट्रिमोनी साईट्सवर मी आतापर्यंत ३००० हून अधिक मुलं रिजेक्ट केली आहेत. यापैकी कोणाच्याही व्यक्तिमत्त्वाने माझ्या आत्म्याला स्पर्श केला नाही."

"आशा आहे की, माझा तो 'मिस्टर राईट' ही पोस्ट वाचेल आणि मला लवकरच भेटेल. आपल्या सोलमेटला भेटण्यासाठी मी एखाद्या लहान मुलासारखी उत्सुक आहे."

















