टीव्ही अभिनेत्री आशका गोराडियाने पतीसोबत केला योगा, इंटरनेटवर फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 18:25 IST2021-12-22T17:50:05+5:302021-12-22T18:25:47+5:30

टेलिव्हिजन इंडस्ट्रीत चांगले नाव कमाविल्यानंतर अभिनेत्री आशका गोराडियाने अभिनयाला अलविदा केलं आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
आशकाने आपल्या करिअरमध्ये 'लागी तुझसे लगन' आणि 'कुसुम' या हिट मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिने घेतलेल्या निर्णयामुळे चाहते नाराज झाले होते.(फोटो: इंस्टाग्राम)
आशका गोराडिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि नेहमी योगा करताना दिसते.(फोटो: इंस्टाग्राम)
आशका गोराडिया आपल्या पतीसोबत समुद्र किनारी योगा करतानाचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
आशकाने 2016 मध्ये ब्रेंटला डेट करणे सुरु केले होते आणि याचवर्षी दोघांनी साखरपुडा केला होता. (Photo Instagram)
दोघांनी 4 डिसेंबर 2017 ला लग्न केले होते. लग्नानंतर दोघे गोव्यात राहतात (Photo Instagram)
म्हणून अनेक वेळा दोघे योगा करताना समुद्र किनारी दिसतात. (फोटो: इंस्टाग्राम)
शेवटची ती २०१९ साली डायन मालिकेत झळकली होती. तिने बऱ्याच रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. (फोटो: इंस्टाग्राम)