आयफेल टॉवरसमोर अभिजीत सावंतचा बायकोसोबत लिपलॉक, वाढदिवशी शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:52 IST2025-07-01T12:44:21+5:302025-07-01T12:52:29+5:30
'सिटी ऑफ लव्ह' पॅरिसमध्ये अभिजीत सावंतचा बायकोसोबत रोमान्स

'मोहोब्बतें लुटाऊंगा' या गाण्यामुळे सर्व रसिकांच्या मनावर राज्य करणारा मराठमोळा गायक अभिजीत सावंत (Abhijeet Sawant). इंडियन आयडॉल या म्युझिक रिअॅलिटी शोच्या पहिल्याच सीझनमध्ये तो विजेता ठरला.
काही वर्षांपासून अभिजीत सावंत प्रसिद्धीझोतापासून दूर होता. त्याच्याकडे फारसं कामही नव्हतं. मग बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये तो आला आणि पुन्हा लोकप्रिय झाला.
अभिजीतने २००७ साली शिल्पा एडवणकरसोबत लग्न केलं. शिल्पा त्याची बालमैत्रीणच होती. दोघंही माहिमला एकाच चाळीत राहत होते.
शिल्पा आणि अभिजीतने ७ वर्ष एकमेकांना डेट केलं. दोघांच्याही घरी त्यांच्या नात्याची कल्पना होती. २००५ साली अभिजीतने इंडियन आयडॉलची ट्रॉफी जिंकली. तो स्टार गायक झाला.
यानंतर २ वर्षांनी त्याने शिल्पाशी लग्न केलं. त्यांना दोन मुली झाल्या. आज शिल्पा आपला वाढदिवस साजरा करत आहे. शिल्पा लाईमलाईटपासून दूर असते. तिचा स्वत:चा केकचा व्यवसाय आहे.
काही दिवसांपूर्वीच अभिजीत कुटुंबासोबत पॅरिसला फिरायला गेला होता. त्याने या टूरवरचे अनेक फोटो शेअर केले होते.
आज पत्नीच्या वाढदिवशी त्याने पॅरिसचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये आयफेल टॉवरसमोर दोघंही लिपलॉक करताना दिसत आहेत. अभिजीतने हा फोटो पोस्ट करत बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.