'आई कुठे काय करते' मधील मायाच्या दिलखेचक अदा; पोलका डॉट साडीमध्ये दिसतेय झक्कास
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:27 IST2024-07-30T17:19:46+5:302024-07-30T17:27:54+5:30
अक्षया गुरव हे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय नाव आहे.

'मेंदीच्या पानावर', 'मानसीचा चित्रकार तो', 'राधा प्रेम रंगी रंगली', 'लव्ह लग्न लोचा' या मालिकांमध्ये अभिनेत्री अक्षया गुरव दिसली होती.
अलिकडे अक्षया स्टारप्रवाहवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेत झळकली होती.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने अक्षयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
अलिकडेच ती 'डंका' या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे.
अक्षया गुरव सोशल मीडियावर कायमच अॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते.
नुकतेच तिने पोलका डॉट साडी नेसून खास फोटो क्लिक केले आहेत.
फोटोंमध्ये पोलका डॉट साडी त्यावर स्लिव्हलेस ब्लाऊज अन् मोकळे केस असा अभिनेत्रीचा दिलखेचक अंदाज पाहायला मिळतो आहे.