ब्युटिफुल!! ‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील ‘ईशा’चं ग्लॅमरस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 16:18 IST2022-03-14T16:03:00+5:302022-03-14T16:18:15+5:30
Aai Kuthe Kay Karte : अरूंधतीची लाडकी लेक रिअल लाईफमध्ये आहे फारच ग्लॅमरस, पाहा फोटो

‘आई कुठे काय करते’ ही मालिकाच नाही तर या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय आहे. मग ती अरूंधती असो, संजना असो, अनिरूद्ध असो किंवा ईशा.
होय, ईशाला तुम्ही ओळखत असालच. मालिकेतील अरूंधतीची लाडकी लेक ईशा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
आम्ही बोलतोय ते ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे हिच्याबद्दल. ईशाचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अपूर्वा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
अपूर्वाच्या ताज्या फोटोंची सध्या चर्चा आहे. यात ती एकदम ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे.
मालिकेत साधी सरळ ईशा अर्थातच अपूर्वा रिअल लाईफमध्ये फारच ग्लॅमरस आहे.
सोशल मीडियावर अपूवार्चा चाहता वर्ग मोठा असून तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओंना चाहते भरभरुन प्रतिसाद देत असतात.
अपूर्वाने हिंदी मालिकेतसुद्धा काम केलं आहे. ती नुकतीच ‘वागळे की दुनिया’या प्रसिद्ध हिंदी मालिकेत झळकली आहे.