जरीची साडी नेसून...! 'आई कुठे...'मधील ईशाचे सुंदर फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 05:23 PM2024-04-09T17:23:48+5:302024-04-09T17:45:35+5:30

'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली. गुढीपाडव्यानिमित्त तिने खास फोटोशूट केलं आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. कलाकारही घरोघरी गुढी उभारुन नववर्षाचं स्वागत करतात.

'आई कुठे काय करते' मालिकेत ईशाची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा गोरे घराघरात पोहोचली. गुढीपाडव्यानिमित्त तिने खास फोटोशूट केलं आहे.

अपूर्वा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटसाठी तिने खास लाल रंगाची पैठणी साडी नेसून मराठमोळा लूक केला आहे.

त्यावर पारंपरिक दागिने, नाकात नथ आणि कानात झुमके घालून अपूर्वा गुढीपाडव्यासाठी नटलेली दिसत आहे.

अपूर्वाचं फोटोतील सौंदर्य पाहून चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत.

अपूर्वाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.