'आई कुठे काय करते'मधून अचानक गायब झाली होती यशची गौरी, आता काय करते माहितीये का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 12:14 IST2024-05-17T12:07:11+5:302024-05-17T12:14:40+5:30
मालिकेतून अचानक एक्झिट घेतलेली गौरी सध्या काय करते हे तुम्हाला माहितीये का?

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या आणि लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
या मालिकेतील देशमुख कुटुंबीयांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अरुंधतीप्रमाणेच या मालिकेतील इतर कलाकारांनाही पसंती मिळाली.
'आई कुठे काय करते'मधील यश-गौरी ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या या जोडीवर प्रेक्षकही प्रेम करायचे.
मालिकेत त्यांचा साखरपुडाही झाल्याचं दाखविण्यात आलं होतं. पण, त्यानंतर गौरी अचानक यशच्या आयुष्यातून निघून गेल्याचं दाखविण्यात आलं होतं. मालिकेतही त्यानंतर गौरी दिसली नाही.
'आई कुठे काय करते'मध्ये अभिनेत्री गौरी कुलकर्णीने यशची गर्लफ्रेंड गौरीची भूमिका साकारली होती. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
पण, मालिकेतून अचानक एक्झिट घेतलेली गौरी सध्या काय करते हे तुम्हाला माहितीये का?
गौरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही ती चाहत्यांना देत असते.
'आई कुठे काय करते' मालिकेनंतर आता गौरी सन मराठीवरील 'प्रेमास रंग यावे' या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
या मालिकेत ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.