‘रिल लाईफ’ वहिनीसोबत ‘रिअल लाईफ’मध्ये लग्न; पाहा, नील-ऐश्वर्याचे रोमॅन्टिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 16:06 IST2021-11-30T15:56:34+5:302021-11-30T16:06:53+5:30
होय, स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेच्या सेटवर नील व ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आज त्यांनी लग्नगाठ बांधली.

मालिका वा चित्रपटाच्या सेटवर एकमेकांसोबत काम करता करता कलाकारांची लव्हस्टोरी सुरू होते आणि मग लग्न. अशी अनेक उदाहरणं सापडतील. ताज उदाहरण नील भट्ट व ऐश्वर्या शर्मा यांचं.

होय, स्टार प्लस वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेच्या सेटवर नील व ऐश्वर्या एकमेकांच्या प्रेमात पडले आणि आज त्यांनी लग्नगाठ बांधली.

‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेत ऐश्वर्याने नीलच्या वहिनीची भूमिका साकारली आहे. नील विराटच्या भूमिकेत आहे तर ऐश्वर्याने पत्रलेखाची भूमिका साकारणारी आहे.

आता हीच रिल लाईफ दीर-भावजयीची जोडी रिअल लाईफमध्ये पती-पत्नी बनले आहेत. आज उज्जैनमध्ये दोघांचाही विवाह सोहळा पार पडला.

ऑक्टोबर 2020 मध्ये ‘गुम है किसी के प्यार मे’ ही मालिका सुरू झाली होती. त्याच्या महिनाभरआधी ऐश्वर्या व नीलची पहिली भेट झाली होती आणि या भेटीनंतर महिनाभरातच दोघांनीही आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

जानेवारी 2021 मध्ये नील व ऐश्वर्याने साखरपुडा केला होता. साखरपुड्याचे फोटो दोघांनीही सोशल मीडियावर शेअर केले होते.

2009 मध्ये ‘जो इश्क की मर्जी वो रब की मर्जी’ या मालिकेपासून नीलने त्याच्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. पण त्याला खरी ओळख मिळाली ती ‘12/24 करोल बाग’ या मालिकेने. 2012 मध्ये ‘रामायण’ या मालिकेत त्याने लक्ष्मणाची भूमिका साकारली होती.

ऐश्वर्याने मेरी दुर्गा, माधुरी टॉकिज अशा मालिकेत काम केलेय. गेल्या 5 वर्षांपासून ती टीव्ही इंडस्ट्रीत आहे. ऐश्वर्या इंजिनिअर आहे. पण आता ती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

















