बॉयफ्रेंडच्या मदतीने सुनेने सासूचा काटा काढला, पुढे सासऱ्यांना कळालं आणि...; 'हा' थ्रिलर सिनेमा पाहून चक्रावून जाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:53 IST2025-11-17T12:35:22+5:302025-11-17T12:53:12+5:30
ओटीटीवरील भन्नाट कथा असलेला हा सिनेमा पाहून तुम्हाला धक्का बसेल. जाणून घ्या अंगावर काटा आणणाऱ्या या सिनेमाबद्दल

एक असा सिनेमा जो पाहून तुमचं डोकं चक्रावून जाईल. इतकंच नव्हे सिनेमाची भन्नाट कथा ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. कोणता आहे हा सिनेमा?

या सिनेेमाचं नाव आहे 'उडल' (udal). हा एक मल्याळम सिनेमा आहे. ज्याची कहाणी एक मुलगी, तिचा बॉयफ्रेंड आणि तिच्या सासऱ्याभोवती फिरते.

अंथरुणाला खिळून असलेल्या सासूला सांभाळून सून आणि तिचा सासरा वैतागला असतो. सासरा अंध असून त्याला ऐकूही येत नाही. एक दिवस सून तिच्या बॉयफ्रेंडच्या मदतीने सासूचा खून करते.

मध्यंतरापर्यंत 'उडल' सिनेमात अनेक ट्विस्ट आहेत. मध्यंतरानंतर मात्र सासरे या घटनेचा कसा बदला घेतात, याची रंजक कहाणी पाहता येईल.

'उडल' या सिनेमात दुर्गा कृष्णन, दयान श्रीनिवासन आणि इंद्रन्स सारखे कलाकार आहेत. सिनेमात तीनच पात्र असून एका रात्रीत घडणारी गोष्ट दिसते

'उडल' सिनेमा हॉरर नसला तरीही त्याची ट्रीटमेंट भयपटासारखी आहे. सिनेमाचा प्रत्येक प्रसंग पाहून काळजाचा ठोका चुकतो

'उडल' हा सिनेमा तुम्ही प्राईम व्हिडीओ या ओटीटीवर पाहू शकता. सुरुवात काहीशी संथ वाटत असली तरी नंतर हा सिनेमा प्रेक्षकांची पकड घेण्यात यशस्वी होतो.

















