४२ वर्षीय साऊथ ब्युटीमुळे थलपति विजयचा मोडला संसार? अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव, कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:42 IST2026-02-28T12:14:24+5:302026-02-28T12:42:20+5:30
लग्नाच्या २७ वर्षांनी थलपति विजय आणि संगीता एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. यामागे थलपति विजयचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं सांगण्यात येत आहे. ही अभिनेत्री नक्की कोण आहे, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

साऊथ स्टार थलपति विजय त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. थलपति विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

लग्नाच्या २७ वर्षांनी थलपति विजय आणि संगीता एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. यामागे थलपति विजयचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं सांगण्यात येत आहे.

थलपति विजयचे अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. ही अभिनेत्री नक्की कोण आहे, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

थलपति विजयचं नाव साऊथ ब्युटी तृषा क्रिष्णनसोबत जोडलं जात आहे. तृषाचे थलपति विजयसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोंना तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका फोटोला तिने "वादळात शांतता आणि वादळाला शांतता...पुढे अनेक माइलस्टोन आहेत", असं कॅप्शन दिलं आहे.

तृषा कृष्णन ४२ वर्षांची असून थलपति विजयसोबत तिने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.

घिली, आथी, कुरुवी, थिरुपची या सिनेमांमध्ये ते एकत्र दिसले. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या लिओ सिनेमातही त्यांनी एकत्र काम केलं होतं.

एका इव्हेंटमध्ये विजयने तृषाला प्रिंसेस म्हटलं होतं. विजयच्या बर्थडेलाही तृषाने अनेकदा खास फोटो शेअर केल्याचं तिच्या अकाऊंटवर पाहायला मिळत आहे.

२०२१ मध्ये थलपति विजयच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती पडल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं आहे. अभिनेत्रीपासून सगळे संबंध तोडणार असल्याचं आश्वासन त्याने दिलं होतं. मात्र तरीही त्यांचं अफेअर सुरू होतं.

थलपति विजयने संगीतासोबत १९९९ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. २७ वर्षांनी ते घटस्फोट घेत असून संगीताने विजयकडे पोटगीची मागणी केली आहे.

















