माणूस आणि आत्मा यांची अनोखी कहाणी! ३० कोटींचं बजेट अन् १५० कोटींची कमाई, तुम्ही पाहिलाय 'हा' सिनेमा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:45 IST2026-02-03T13:26:17+5:302026-02-03T13:45:10+5:30
आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाच्या जोरावर एका सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला अन् सध्या चांगलाच गाजतोय

आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाच्या जोरावर एका सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला अन् सध्या चांगलाच गाजतोय

या सिनेमाचं नाव आहे सर्वम माया (sarvam maya). या मल्याळम चित्रपटाने अवघ्या ३० कोटींच्या बजेटमध्ये १५० कोटींहून अधिक कमाई करून सर्वांना थक्क केले आहे.

सिनेमागृहात यशस्वी ठरल्यानंतर आता सर्वम माया हा सिनेमा ओटीटीवरही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्या जिओ+हॉटस्टारवर हा सिनेमा चांगलाच गाजतोय.

'सर्वम माया'ची कथा प्रभेंदू नंबूदिरी या तरुणाभोवती फिरते, जो एका पारंपारिक ब्राह्मण कुटुंबातील असून संगीत दिग्दर्शक आहे.

प्रभेंदूला परदेशात जाण्याची इच्छा असते, पण ती पूर्ण न झाल्याने तो आपल्या गावी परततो आणि धार्मिक कार्यात आपल्या भावाला मदत करू लागतो.

या प्रवासात त्याची भेट 'डेलुलु' नावाच्या एका आत्म्याशी (Soul) होते. या आत्म्याला स्वतःच्या भूतकाळाबद्दल काहीच आठवत नसते.

प्रभेंदू त्या आत्म्याला मदत करतो आणि हळूहळू त्या दोघांमध्ये एक भावनिक नाते निर्माण होते. हीच रंजक गोष्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवते. साधं आणि भावनिक कथानक असणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

















