विजय देवरकोंडाशी फेब्रुवारीत खरंच लग्न करणार रश्मिका? स्वत:च दिलं उत्तर; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:38 IST2026-01-19T17:17:20+5:302026-01-19T17:38:12+5:30

लग्नाच्या चर्चांवर अखेर रश्मिकानेच दिली प्रतिक्रिया, पुढच्या महिन्यात लग्नबंधनात अडकणार?

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं पॉवर कपल आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

विजय आणि रश्मिकाने 'डिअर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम' या दोन सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. 'गीता गोविंदम'नंतरच रश्मिका नॅशनल क्रश बनली होती. नंतर 'पुष्पा'मध्ये श्रीवल्ली भूमिकेने तिला आणखी प्रसिद्धी दिली.

रश्मिका आणि विजयच्या अफेअरच्या चर्चा थांबून आता त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. २६ फेब्रुवारी रोजी दोघंही उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे.

नुकतंच दोघांनी इटलीतील रोमँटिक शहर रोम येथे नवीन वर्षाचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवारही होता. मात्र विजयने पहिल्यांदाच रश्मिकाची झलक दिसणारे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.

इतकंच नाही तर विजय आणि रश्मिका इतर वेळी वेगवेगळे विमानतळावर दिसतात. पण यावेळी रोमवरुन येताना दोघं एकत्रच आले. यावरुन त्यांच्या लग्नाची बातमी जवळपास कन्फर्मच झाली.

दरम्यान नुकतंच एका दाक्षिणात्य चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रश्मिकाला फेब्रुवारीतील लग्नाच्या चर्चांवर थेट प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिनेही सरळ उत्तर दिलं.

रश्मिका मंदाना म्हणाली, "या अफवा गेल्या चार वर्षांपासून सुरु आहेत, बरोबर ना? आणि लोक अजूनही हाच प्रश्न विचारत आहेत. ते याचीच वाट पाहत आहेत.

"आज मी सांगते की योग्य वेळ असेल तेव्हाच मी याबद्दल बोलेन. मी यावर आता ऑफ कॅमेरा चर्चा करेन, पण कॅमेऱ्यासमोर नाही.'