ब्यूटी विथ ब्रेन! आधी सिनेमाने कमावले १००० कोटी, आता अभिनेत्री MBBS डॉक्टर झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 18:35 IST2026-02-11T18:19:46+5:302026-02-11T18:35:56+5:30
मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीच्या सिनेमाने तब्बल १००० कोटी कमावले. सिनेसृष्टीत गाजलेली ही अभिनेत्री आता डॉक्टर झाली आहे. त्यामुळे सर्वांनी तिचं कौतुक केलं आहे

मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीच्या सिनेमाने तब्बल १००० कोटी कमावले. सिनेसृष्टीत गाजलेली ही अभिनेत्री आता डॉक्टर झाली आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे श्रीलीला. काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'पुष्पा २' सिनेमात श्रीलीलाने आयटम साँग केलं होतं. या सिनेमाने तब्बल १००० कोटी कमावले होते.

श्रीलीलाने मुंबईतील प्रसिद्ध 'डी. वाय. पाटील विद्यापीठा'तून (D.Y. Patil University) एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. १० फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात (Graduation Ceremony) तिला ही पदवी प्रदान करण्यात आली.

गेल्या सहा वर्षांपासून चित्रपट आणि शिक्षण अशा दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर अखेर तिने तिची वैद्यकीय पदवी (MBBS) पूर्ण केली आहे. ही आनंदाची बातमी कळताच चाहत्यांनी श्रीलीलाचं कौतुक केलं आहे.

श्रीलीलाचा पदवी स्वीकारतानाचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अभिनयासोबत मी शिक्षणातही सरस आहे, हेच श्रीलीलाने दाखवून दिलंय

श्रीलीलाने २०२० मध्ये आपल्या वैद्यकीय शिक्षणाला सुरुवात केली होती. याच काळात तिने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

अभिनयाचा व्याप सांभाळत वैद्यकीय शिक्षणासारखा कठीण विषय पूर्ण करणे सोपे नव्हते, मात्र श्रीलीलाने हे शक्य करून दाखवले. चाहते श्रीलीलाचं मनापासून अभिनंदन करत आहेत.

















