फोटोतला 'हा' चिमुकला गाजवतोय बॉक्स ऑफिस, प्रेक्षकांच्या गळ्यातील बनला ताईत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 06:20 PM2024-01-19T18:20:33+5:302024-01-19T18:52:48+5:30

'हनुमान' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार अभिनेता आहे तरी कोण? हे देखील जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत.

सध्या सोशल मीडियावर अनेक स्टार्सचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण बर्‍याचदा नेटकऱ्यांना ते स्टार्स कोण आहेत हे ओळखता येत नाही. आताही एका लोकप्रिय अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या कडेवर दिसत आहे.

हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नाही तर सुपरस्टार तेजा सज्जा आहे. सुपरस्टार तेजा सज्जा स्टारर 'हनुमान' चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज झाला आहे. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

'हनुमान' सिनेमात हनुमंतची भूमिका साऊथ स्टार तेजा सज्जाने साकारली आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सध्या सगळीकडे तेजा सज्जाचीच चर्चा आहे. तर आपण जाणून घेऊया 'हनुमान'मध्ये दिसणारा तेजा सज्जा कोण आहे.

तेजा सज्जाचा जन्म 1995 साली हैदराबाद (आजचे तेलंगणा) येथे झाला. हैदराबाद पब्लिक स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले.

तेजाने लहान वयातच चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. वयाच्या अवघ्या 2 व्या वर्षी त्यांनी चिरंजीवीच्या Choodalani Vundi या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले.

तेजा सज्जाने 2021 मध्ये Zombie Reddy त मुख्य भुमिका साकारली. ज्याला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. याशिवाय 'इश्क : नॉट अ लव्ह स्टोरी' आणि 'आमधव' या सायन्स फिक्शन चित्रपटात आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

बालकलाकार म्हणून जवळजवळ 50 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

समांथासोबत तो 'ओह बेबी' या सिनेमातही दिसला होता.

तर 'हनुमान' या सिनेमाने आतापर्यंत तब्बल ११५ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा सगळ्याच बाजूने परफेक्ट ठरत असल्यामुळे प्रेक्षकवर्ग आपोआप त्याच्याकडे खेचला जात आहे.