तूच माझा सूर्य, तूच चंद्र...! अदिती राव हैदरी सिद्धार्थसोबत लग्नबंधनात अडकली, शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 12:06 IST2024-09-16T11:57:18+5:302024-09-16T12:06:39+5:30
दाक्षिणात्य पद्धतीने दोघांचं लग्न झालं. साऊथमधील १०० वर्ष जुन्या मंदिरात त्यांनी लग्नगाठ बांधली.

अदिती आणि सिद्धार्थ दाक्षिणात्य पारंपरिक पद्धतीत लग्नबंधनात अडकले. कुटुंबाच्या साक्षीने त्यांनी सातफेरे घेतले. हे फोटो त्यांच्या पुढील प्रवासाची साक्ष देत आहेत.
सिनेसृष्टीतील गेल्या काही दिवसांपासून सर्वात चर्चेत असलेली जोडी म्हणजे अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) आणि सिद्धार्थ (Siddharth). दोघंही नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. अदितीने फोटो शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली.
गोल्डन रंगाची नेटची साडी, त्याच रंगाचा ब्लाऊज, सोन्याचे दागिने आणि केसात गजरा असा या लूकमध्ये अदिती नटली आहे. नवरीच्या या रुपावर सिद्धार्थही फिदा झालेला दिसत आहे.
अग्नीच्या साक्षीने आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नाचे विधी पूर्ण केले. आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं वचन देत त्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला.
साऊथमधील १०० वर्ष जुन्या प्रसिद्ध मंदिरात ते लग्नबंधनात अडकल्याचं दिसत आहे. त्यांचं हे फोटोशूटही खूपच खास आहे. साधं पण तितकंच क्लासिक असं हे फोटोशूट आहे.
लग्नानंतर दोघांनी एकमेकांना मारलेली मिठी खरोखर मॅजिकल आहे. 'तूच माझा सूर्य, तूच चंद्र आणि सगळे तारे.. अनंतकाळासाठी आपण एकमेकांचे झालो आहोत.. असंच हसत राहू कधीच मोठे व्हायला नको...कायम प्रेम, प्रकाश आणि जादू...मिसेस अँड मिस्टर अदू-सिद्धू." असं कॅप्शन अदितीने दिलं आहे.
इंडस्ट्रीतील कलाकार आणि चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चार महिन्यांपूर्वीच त्यांनी गुपचूप साखरपुडा केला होता. आता दोघंही आयुष्यभरासाठी एकत्र आले आहेत.