IN PICS : अक्षय, जॉन, रणवीरच्या या ‘धाकड’ सिनेमांनी संपणार यंदाचं साल, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 08:00 AM2021-10-29T08:00:00+5:302021-10-29T08:00:11+5:30

2021 हे वर्ष संपतंय.. आणि या सरत्या वर्षाच्या अखेरीस अनेक ‘धाकड’ सिनेमे पे्रक्षकांच्या भेटीस येणार आहेत... त्यावर एक नजर...

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर ‘सूर्यवंशी’ या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा म्हणून फुल टू एंटरटेनमेंट. येत्या 5 नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.

‘83’ हा भारतीय क्रिकेट टीमच्या विजयगाथेवर आधारित सिनेमा कधीचा बनून तयार आहे. कोरोनामुळे तो रखडला होता. रणवीर सिंग व दीपिका पादुकोणचा हा सिनेमा 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

जॉन अब्राहमचा जबरदस्त अ‍ॅक्शनपॅक्ड असा ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजे 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

सलमान खान आणि आयुष शर्मा यांचा ‘अंतिम’ हा महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेला सिनेमाही नोव्हेंबर महिन्यातच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. त्याचा पहिलावहिला सिनेमा ‘तडप’ येत्या 3 डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

आयुष्यमान खुराणा व वाणी कपूर हेही एक अनोखा सिनेमा घेऊन येत आहेत. चंडीगड करे आशिकी नावाचा हा सिनेमा 10 डिसेंबरला थिएटरमध्ये धडकणार आहे.

बंटी और बबली 2 हा सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदीचा सिनेमा येत्या 19 नोव्हेंबरला प्रेक्षक पाहू शकणार आहेत.

Read in English