सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:01 IST2026-05-13T11:57:47+5:302026-05-13T12:01:20+5:30

मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही सिद्धार्थने नाव कमावलं आहे. त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याच्या पत्नीची मोठी साथ लाभली.

सिद्धार्थ जाधव हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या सिद्धार्थने टॅलेंटच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली.

केवळ मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही सिद्धार्थने नाव कमावलं आहे. त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याच्या पत्नीची मोठी साथ लाभली.

सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचं नाव तृप्ती असं आहे. तृप्ती एक बिजनेसवुमन आहे.

तृप्तीने स्वईरा नावाची एंटरप्राइजेस कंपनी सुरू केली आहे. यामधून तिने साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.

या बिजनेससाठी तृप्तीने ५० लाखांचं कर्ज घेतलं होतं. मैत्रिणीसोबत मिळून तिने हा व्यवसाय सुरू केला.

त्यानंतर तिने होम स्टेच्या उद्देशाने नागावमध्ये एक व्हिला देखील खरेदी केला आहे.

तृप्ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. २००७मध्ये सिद्धार्थसोबत लग्न करत तिने संसार थाटला.

त्यांना स्वरा आणि ईरा या दोन मुली आहेत. या मुलींच्या नावानेच तिने स्वईरा ही कंपनी सुरू केली.

सध्या सिद्धार्थ पत्नी आणि मुलींसोबत परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.