Shubman Gill Viral Photo dating: गिल अन् दोन सारांची चर्चा राहुद्या बाजूला... आता 'या' अभिनेत्रीशी जोडलं जातंय कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 10:56 AM2023-01-25T10:56:14+5:302023-01-25T11:05:47+5:30

शुबमनचे नाव सारा तेंडुलकर आणि सारा अली खान या दोघींशीही जोडले गेले आहे.

Shubman Gill Viral Photo dating: भारताचा युवा फलंदाज शुभमन गिल सध्या प्रचंड फॉर्मात आहे. त्याने नुकत्याच झालेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या वन डे मालिकेत पहिल्या सामन्यात अर्धशतक, दुसऱ्या सामन्यात द्विशतक तर तिसऱ्या सामन्यात दमदार शतक झळकावले. एकाच वन डे मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमापासून तो केवळ १ धावेने चुकला.

शुबमन गिलच्या खेळीची जोरदार चर्चा झाली. शुबमन गिलचे नाव सारा तेंडुलकर आणि सारा अली खान यांच्याशीही जोडले गेलेच. पण सध्या मात्र तो एका वेगळ्याच अभिनेत्रीशी नाव जोडले जात असल्याने चर्चेत आहे.

गिल आणि सारा तेंडुलकर या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी चर्चा होती. पण त्याच वेळी शुबमन गिल आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या डिनर डेटचा फोटो व्हायरल झाला. त्यामुळे चाहते गोंधळले. तशातच आता गिलचे नाव एका तिसऱ्याच अभिनेत्रीशी जोडले जात आहे.

हा अभिनेत्री म्हणजे, पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा. सोनम बाजवा ही सध्या शुबमन गिलसोबत तिच्या व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे चर्चेत आहे. शुबमन गिल आणि सोनम एका फोटोत हस्तांदोलन करत आहेत.

सोनम बाजवा आणि शुभमन गिल यांचा व्हिडीओ आणि फोटो ट्विटरवर व्हायरल झाला आहे. त्यात दोघे हँडशेक करताना दिसत आहेत. या फोटोवर चाहते अनेक प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण सोनमचे नाव शुभमनशी जोडत आहेत, तर काही जण दोघे केवळ मित्र असू शकतात असा अंदाज बांधताना दिसत आहेत.

सोनम बाजवाने नुकतेच एक ट्विटदेखील केले होते. त्या ट्विटमध्ये तिने सारा या शब्दाचा वापर अतिशय चतुरपणे केला. जाणून घेऊया या व्हायरल फोटोमागील सत्य.

शुभमन गिल त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला होता, जेव्हा शुबमन सोनमच्या टॉक शोमध्ये दिसला. सोनमने त्याला सारा अली खानसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवरून खूपच खोदून खोदून विचारले. सोनमने विचारले की तू तिला डेट करत आहेस का? त्यावर त्याने उत्तर दिले की- हो, कदाचित करतोय. त्यावर सोनम बाजवा हसली आणि म्हणाली सारा दा सारा सच बोलो.

दरम्यान, सोनमशी गिलचे नाव जोडण्यावरून झालेल्या चर्चांवर सोनमने स्पष्टीकरण दिले आहे की, तिच्या आणि शुभमनमध्ये असे काहीही नाही.

पण सोनम बाजवाच्या व्हिडिओतून चाहत्यांना एक हिंट नक्की मिळाली, की सारा अली खान आणि शुबमन गिल डेट करत आहेत.