छोटी बिट्टू नवरी झाली..., थाटामाटात झालं शाहिद कपूरच्या बहिणीचं लग्न, भावाने लिहिली भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:07 AM2022-03-03T11:07:49+5:302022-03-03T11:27:30+5:30

Shahid Kapoor Sister Sanah Wedding : शाहिद कपूरची बहिण सनाचा नवरा आहे या प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा, पाहा लग्नाचे फोटो

बॉलिवूडमध्ये सध्या वेडिंग सीझन सुरू आहे. कालच बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची बहिण सना कपूर ही सुद्धा लग्नबंधनात अडकली. काल मोठ्या सनाचा लग्नसोहळा पार पडला.

सना कपूरनं बॉयफ्रेन्ड मयंक पाहवासोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोजक्याच लोकांच्या उपस्थितहा लग्नसोहळा पार पडला.

सनाचा भाऊ शाहिद कपूर आणि वहिनी मीरा राजपूत या लग्नात हजर असणारच. दोघांनीही सनाला प्रेमाने आशीर्वाद दिला.

शाहिदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बहिणीसोबतचा एक फोटो शेअर केला. ‘वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. आणि माझी छोटीशी बिट्टू आज नवरी बनली आहे. तुला आणि मयंकला नेहमीच प्रकाशमय आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा,’असं त्यानं लिहिलं.

सनाची वहिनी मीरा राजपूतनेसुद्धा भावनिक पोस्ट लिहीत नणंदबाईला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. सना आणि मयंकचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा पार पडला होता. त्यांनतर काल हे दोघे विवाहबंधनात अडकले.

सना कपूर ही पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. तर मयंक हा अभिनेता मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांचा मुलगा आहे. या दोन्ही कुटुंबात जुनी मैत्री आहे.

सना कपूरसुद्धा एक अभिनेत्री आहे. सनाने शाहिद कपूर आणि आलिया भट्टच्या ‘शानदार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती.परंतु तिचं करिअर म्हणावं तितकं यशस्वी ठरलं नाही.

सना ही शाहिद कपूरची सावत्र बहिण आहे. शाहिद कपूरच्या खऱ्या आईचे नाव नीलिमा अजीम आहे.

अभिनेता शाहिद कपूरचं. शाहिद नेहमीच आपल्या सवत्र बहिण आणि भावासोबत काही महत्त्वाचे क्षण व्यतीत करताना दिसतो.