रवीना टंडनची लेकीसोबत युरोप ट्रीप, 49व्या वर्षीही दिसतेय फीट अन् सुंदर; शेअर केले Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 14:32 IST2024-07-22T14:28:18+5:302024-07-22T14:32:57+5:30
रवीना टंडन अन् राशा थडानीच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) वयाच्या 49 व्या वर्षीही कमालीची सुंदर आणि फीट दिसते. ८० ते ९० चं दशक गाजवणारी ही अभिनेत्री आता ओटीटीच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करते.
रवीनाची लेक राशा थडानीही (Rasha Thadani) सध्या चर्चेत असते. राशाचं नुकतंच ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असून तिच्या इंडस्ट्रीतील पदार्पणाची चर्चा आहे. शिवाय आई प्रमाणेच राशाही अतिशय सुंदर आहे.
मायलेकी सध्या परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. युरोप ट्रीपमधील मनमोहक ठिकाणांचे फोटो शेअर केलेत. बुडापेस्ट, हंगेरी याठिकाणचे फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
ऑलिव्ह ग्रीन रंगाचा कोऑर्ड सेट या आऊटफिटध्ये रविनाने पोज दिली आहे. नो मेकअप लूकमध्ये ती सुंदर दिसत आहे.
तर राशा ब्लॅक आऊटफिटमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. मायलेकीचा हा सेल्फी खूपच गोड आला आहे.
रवीनाने आपल्या डे टूरचीही झलक यामध्ये दाखवली. बुडापेस्टचं आर्किटेक्चरल सौंदर्य यामध्ये दिसत आहे. 'ऑल इन अ डेज वर्क' #Budapest असं कॅप्शन तिने दिलं आहे.
रवीनाने 2004 साली फिल्म डिस्ट्रिब्युटर अनिल थडानीसोबत लग्न केलं. 2005 साली तिने राशाला जन्म दिला. तर 2008 साली तिला मुलगा झाला. रणबीरवर्धन असं त्याचं नाव आहे.