हॉलपासून बेडरुमपर्यंत प्रचंड लक्झरी आहे प्रियांकाचं न्यूयॉर्कमधील घर; पाहा तिच्या घराचे Inside Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 13:03 IST2022-08-29T12:56:29+5:302022-08-29T13:03:05+5:30
Priyanka chopra: या घरात ७ बेडरुम आणि ११ बाथरुम असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे या घराची किंमत १४४ कोटी रुपये इतकी आहे.

उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या प्रियांकाने हॉलिवूडमध्येही तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
अमेरिकन गायक निक जोनाससोबत प्रियांकाने लग्न केल्यापासून ती न्युयॉर्कमध्येच स्थायिक झाली आहे.
प्रियांकाचं अमेरिकेतील घर कसं असेल असा प्रश्न कायम चाहत्यांना पडतो. त्यामुळेच तिचं घर आतून कसं दिसतं ते पाहुयात.
सध्या सोशल मीडियावर प्रियांकाच्या घराचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तिचं संपूर्ण घराची झलक दिसून येते.
ब्लॉगर Sarah Shareef ने अलिकडेच प्रियांकाच्या आलिशान घराचे काही फोटो शेअर केले.
प्रियांकाचं घर अत्यंत सुंदररित्या डिझाइन करण्यात आलं आहे. या घरातील प्रत्येक गोष्ट निवडताना, डिझाइन करताना बारकाईने विचार करण्यात आला आहे.
२०१८ मध्ये निकसोबत लग्न केल्यापासून प्रियांका या घरात राहते.
या घरात मोठा स्विमिंग पूलदेखील आहे. या पूलमधील अनेक फोटो प्रियांकाने शेअर केले आहेत.
या घरात ७ बेडरुम आणि ११ बाथरुम असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे या घराची किंमत १४४ कोटी रुपये इतकी आहे.
प्रियांकाच्या घरातून संपूर्ण शहर दिसतं.
प्रियांका अनेकदा तिच्या घरातले फोटो शेअर करत असते.
प्रियांकाचं घर अत्यंत लक्झरी असल्याचं दिसून येतं.