प्रसाद जवादे-अमृता देशमुखने साजरी केली लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 18:00 IST2024-01-17T17:50:52+5:302024-01-17T18:00:33+5:30
बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) माध्यमातून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अमृता देशमुख (amruta deshmukh) आणि प्रसाद जवादे (prasad jawade).

बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) माध्यमातून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अमृता देशमुख (amruta deshmukh) आणि प्रसाद जवादे (prasad jawade).
काही दिवसांपूर्वीच या जोडीने त्यांच्या लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या ते चर्चेत येत आहे.
बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ही जोडी एकमेकांना डेट करु लागली आणि काही काळातच त्यांनी एकमेकांशी लग्न सुद्धा केलं.
दरम्यान लग्नानंतर त्यांचा पहिला सण मकरसंक्रांत त्यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.
अमृता देशमुखने इंस्टाग्रामवर त्यांच्या संक्रांत सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत अमृताने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. यावर तिने हलव्याचे दागिने घातले आहेत.
तर प्रसादनेही काळ्या रंगाचा सदरा आणि पायजमा घातला आहे. याशिवाय त्याने हलव्याचे दागिने घातले आहेत.
अमृता आणि प्रसाद दोघेही या गेटअपमध्ये छान दिसत आहेत.