रंग माळीयेला..!! पूजा सावंतच्या हातावर सजली सिद्धेशच्या नावाची मेहंदी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 17:07 IST2024-02-27T16:58:15+5:302024-02-27T17:07:49+5:30

Pooja Sawant : प्रथमेश परब, शिवानी सुर्वे, तितिक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके यांच्यानंतर आता अभिनेत्री पूजा सावंत लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे.

प्रथमेश परब, शिवानी सुर्वे, तितिक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके यांच्यानंतर आता अभिनेत्री पूजा सावंत लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. पूजाची लगीनघाई सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर तिच्या संगीत सेरेमनीतील व्हिडिओ समोर आले होते. आता नुकताच पूजाचा मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला.

पूजा सावंतच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, रंग माळीयेला.

पूजा सावंतने मेहंदी सेरेमनीला मल्टी कलरचा लेहंगा परिधान केला आहे. त्यात तिने गळ्यात नेकलेस परिधान केला आहे आणि मोकळे केस सोडले आहेत.

तर सिद्धेशने व्हाइट रंगाचा कुर्ता घातला आहे. त्यानेदेखील हातावर मेहंदी काढलेली दिसत आहे.

पूजा सावंतच्या मेहंदीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.

पूजा आता लवकरच सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे.

काही महिन्यांपूर्वीच पूजाने सिद्धेशवरील प्रेमाची कबुली दिली होती. सिद्धेशबरोबरचे फोटो शेअर केल्यानंतर पूजाच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या.