निलेश साबळे ते सई ताम्हणकर, अभिनयाव्यतिरिक्त या क्षेत्रात आहेत कार्यरत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 06:00 IST2023-02-21T06:00:00+5:302023-02-21T06:00:00+5:30
कलाविश्वात असे बरेच कलाकार मंडळी आहेत जे अभिनय शिवाय वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे सेलिब्रिटी...

चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे लोकप्रिय अभिनेता, सूत्रसंचालक आणि लेखक आहे. पण तो एक डॉक्टरदेखील आहे. काही वर्षांपूर्वी निलेश साबळे डॉक्टर म्हणून प्रॅक्टीस ही करायचा.
अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतेच तिचा एक ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. प्राजक्त राज असे त्याचे नाव आहे. याशिवाय प्राजक्ता डान्स ही शिकवते.
अभिनेता सुशांत शेलार राजकारणात सक्रिय आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासाठी तो काम करतो
सई ताम्हणकरचाही क्लोथिंग ब्रँड आहे. ज्याची ती सोशल मीडियावर जाहिरात करत असते.
क्रांती रेडकरचा देखील कपडे आणि ज्वेलरी ब्रँड आहे. जिया झायदा असं तिच्या ब्रॅण्डचं नाव आहे.
यशोमान आपटेने मागील वर्षीच ठाण्यात एक कॅफे सुरू केले आहे.
गश्मीर महाजनी लोकप्रिय अभिनेता तर आहेच. त्याशिवाय तो उत्तम डान्सर आहे. त्याची पुण्यात स्वतःची डान्स अॅकाडमी आहे.
डॉ. अमोल कोल्हे गेले काही वर्षे राजकारणात जास्त सक्रिय आहेत. सध्या ते शिरूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार आहेत.
तेजस्विनी पंडित - अभिज्ञा भावे या दोघींचा क्लोथिंग बिझनेस आहे. तेजाज्ञा असे त्यांच्या ब्रॅण्डचं नाव आहे.तसेच तेजस्विनी एक निर्माती म्हणूनही काम करते