Photos: सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही पूजा ददलानीची लाइफस्टाइल; १० वर्षांपासून आहे शाहरुखची मॅनेजर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 12:33 PM2021-10-28T12:33:08+5:302021-10-28T12:40:42+5:30

Pooja dadlani: पूजाची लाइफस्टाइल कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. पूजाचं घर, तिची संपत्ती ही एकंदरीत सेलिब्रिटींसारखीच आहे.

अभिनेता शाहरुख खान सध्या तिच्या मुलामुळे आर्यन खानमुळे चांगलाच चर्चेत आहे. ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी आर्यनला आर्थर रोड तुरुंगात ठेवलं असून त्याला सोडवण्यासाठी शाहरुख प्रचंड प्रयत्न करत आहे.

ड्रग्ज प्रकरणातून आर्यनची सुखरूप सुटका व्हावी यासाठी शाहरुखने देशातील टॉप वकिलांची फौज उभी केली आहे.

आर्यन प्रकरणात प्रमुख पंच प्रभाकर साईल यांनी शाहरुखच्या मॅनेजरचं पूजा ददलानीचं नाव घेतलं आणि तेव्हापासून पूजा चर्चेत आहे.

पूजा २०१२ पासून शाहरुखकडे मॅनेजर म्हणून काम करत आहे.

पूजाची लाइफस्टाइल कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. पूजाचं घर, तिची संपत्ती ही एकंदरीत सेलिब्रिटींसारखीच आहे.

पूजा सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून तिचे आणि तिच्या कुटुंबाचे फोटो ती सातत्याने शेअर करत असते.

पूजाला एक लहान मुलगी असल्याचं सांगण्यात येतं.

पूजाने शाहरुख आणि त्याच्या कुटुंबियांसोबतचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

आर्यन खान प्रकरणामुळे पूजा सातत्याने चर्चेत येत आहे. या प्रकरणी तिने प्रतिक्रियादेखील दिली होती.

आर्यन हा निष्पाप आहे. त्याला चूकीच्या माहितीमुळे या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असं पूजाने म्हटलं आहे.

पूजाने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील हा एक छानसा फोटो

पूजा ददलानीने शेअर केलेला फोटो ( फोटो सौजन्य: पूजा ददलानी इन्स्टाग्राम पेज)

Read in English