मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रेटींची मुलं कलाविश्वाऐवजी या क्षेत्रात आहेत कार्यरत, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 06:00 AM2022-07-14T06:00:00+5:302022-07-14T06:00:00+5:30

Starkids of Marathi Cine Industry: कलाकारांप्रमाणेच स्टार किड्सदेखील प्रसिद्धीझोतात येत असतात. काही कलाकारांची मुले त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करतात. तर काही स्टारकिड्स वेगळ्या क्षेत्राची वाट निवडतात. चला तर मग जाणून घेऊयात असे काही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत ज्यांची मुलं सिनेइंडस्ट्रीऐवजी आगळंवेगळं करिअर निवडून त्यात यश संपादन करत आहेत.

अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांची थोरली मुलगी देखील पायलट आहे. ईशानीला २०१५ मध्ये वैमानिकाचं 'लाइफटाइम लायसन्स' मिळालं असून ती सध्या मियामी ,फ्लोरिडा येथे वास्तव्यास आहे. तर धाकटी मुलगी कस्तुरी परदेशात एमबीबीएस करते आहे. तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचं आहे.

अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि अभिनेत्री निवेदीता सराफ (Nivedita Saraf) यांचा मुलगाही कलाविश्वात कार्यरत नाही. अनिकेत सराफ शेफ आहे. त्याला जेवण बनवण्यात रस आहे. बालपणी आई निवेदिताला स्वयंपाक करताना बघून त्यालादेखील स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. म्हणून त्याने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे. युट्युबवर 'निक सराफ' या नावाने तो प्रसिद्ध आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक संजय जाधव(Sanjay Jadhav)ची लेक ध्रिती बऱ्याचदा चर्चेत येत असते. ती उत्तम डान्सर आहे. तिला शेफ बनायचे असून ती सध्या याचे शिक्षण घेत आहे.

अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांची लेक सिद्धी नुकतीच परदेशात वैमानिक म्हणजेच पायलट होण्यासाठी गेली आहे. शरद पोंक्षेंना मुलगा स्नेह आणि मुलगी सिद्धी अशी दोन मुलं आहेत. स्नेहने नुकतंच मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकत धर्मवीरच्या दिग्दर्शकांच्या टीममध्ये सहभाग घेतला होता. त्याला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे आहे. तर त्यांची लेक सिद्धीला वैमानिक व्हायचे आहे. त्यासाठी आता ती परदेशात गेली आहे.

आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्धची भूमिका अभिनेता मिलिंद गवळी(Milind Gawali)ने साकारली आहे. मिलिंद गवळीची मुलगी मिथिलाचे लग्न झाले असून तीदेखील सिनेइंडस्ट्रीत कार्यरत नाही. ती फिटनेस ट्रेनर आहे.

प्रसिद्ध अभिनेते नागेश भोसले (Nagesh Bhosale) यांची लेक फिटनेसफ्रिक असलेल्या कुहूनं बॉडिबिल्डींग क्षेत्रात तिची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. कुहू फिटनेस ट्रेनर असून ती खेळाडू देखील आहे ऐमचर ऑलंपियामध्ये तिनं कांस्य पदकाची कमाई केली आहे. हे करिअर निवडण्यासाठी तिला तिच्या घरच्यांचा नेहमीच पाठिंबा होता, असं ती सांगते.

प्रसिद्ध विनोदी अभिनेते अरूण कदम (Arun Kadam) यांची लेकही सिनेसृष्टीपासून दूर आहे. सुकण्या कदम ही एक ग्राफीक डिझायनर आणि उत्कृष्ट भरतनाट्यम डान्सर आहे. सुकन्या एक ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत आहे.