सचिन पिळगावकरांच्या लेकीचा मालदीवमध्ये बोल्ड अंदाज, मोनोकिनीतील फोटोंनी चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:59 PM2023-07-20T16:59:11+5:302023-07-20T17:42:38+5:30

पिळगावकर कुटुंबीय मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. सचिन-सुप्रिया यांच्याप्रमाणेच त्यांची लेक श्रिया पिळगावकरही अभिनेत्री आहे. सध्या पिळगावकर कुटुंबीय मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

श्रिया पिळगावकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मालदीवमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया मालदीवमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. श्रियाने मालदीवमध्ये हे खास व्हॅकेशन प्लॅन केल्याचं सचिन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मालदीवमध्ये श्रिया पिळगावकर मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. श्रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची मोनोकिनी परिधान केल्याचं दिसत आहे.

श्रियाने मालदीवच्या समुद्रकिनारी मोनोकिनीत फोटोशूट केलं आहे. तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते घायाळ झाले आहेत. श्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

श्रियाने अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. अभिनयाबरोबरच श्रिया चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनही करते.

अवघी पाच वर्षांची असल्यापासून बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या श्रियाने २०१३ साली एकुलती एक या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. सचिन पिळगावकरांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.

त्यानंतर श्रिया अनेक हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये दिसली होती. श्रिया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करताना दिसते.