IN PICS : सचिन पिळगावकर सुप्रियांना काय नावाने हाक मारतात माहितीये? वाचून तुम्हीही म्हणाल ‘ Super’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 12:38 PM2022-08-17T12:38:35+5:302022-08-17T12:50:21+5:30

Sachin Pilgaokar Birthday : मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर. काल सुप्रिया यांचा वाढदिवस झाला आणि आज सचिन यांचा वाढदिवस साजरा होतोय...

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर. काल सुप्रिया यांचा वाढदिवस झाला आणि आज सचिन यांचा वाढदिवस साजरा होतोय.

काल सचिन यांनी सुप्रिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि आज सुप्रिया यांनी सचिन यांना. विशेष म्हणजे या निमित्ताने एका खास गोष्टीचा खुलासा झाला.

होय, सचिन सुप्रियांना काय नावानं हाक मारतात, ते यानिमित्ताने कळलं. सचिन यांनी सुप्रिया यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आणि या पोस्टमध्ये त्यांनी सुप्रियांसाठी एक खास शब्द वापरला.

माझ्या अर्धांगिनीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा सुपर... माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

या पोस्टवरून तुमच्या लक्षात आलं असेलच. होय, सचिन सुप्रियांना लाडानं ‘सुपर’ या नावाने हाक मारतात.

एकत्र काम करता करता सचिन आणि सुप्रिया दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि मग लग्नबंधनात अडकलेत.

‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटाच्या सेटवर सचिन आणि सुप्रिया या दोघांचीही पहिली भेट झाली होती. सचिन या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. तसेच ते सिनेमात अभिनय देखील करीत होते. तर सुप्रिया चित्रपटाच्या हिरोईन होत्या.

सुप्रियांच्या गालावरची सुंदर खळी पाहून सचिन त्यांच्यावर भाळले होते. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांचीही प्रेमकहाणी फुलली होती.

दोघांनीही आपलं नातं काही काळ लपवून ठेवलं. यामागचं कारण म्हणजे एक अभिनेत्री दिग्दर्शकाच्या प्रेमात पडली अशी चर्चा त्यांना होऊ द्यायची नव्हती.

सुप्रिया उण्यापुऱ्या 17 वर्षांच्या होत्या तर सचिन 27 वर्षांचे. म्हणजेच दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक होता. यामुळं हे नातं फार काही टिकणार नाही, असा सर्वांचा समज होता. पण या जोडप्यानं हा समज खोटा ठरवला. आजही हे जोडपं आनंदात नांदतंय.