प्राजक्ता माळीचं मराठमोळ्या या अभिनेत्यासोबत ठरलेलं लग्न? पण तो म्हणाला- "तिची आई माझ्याकडे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 12:09 IST2025-08-19T12:05:33+5:302025-08-19T12:09:34+5:30

Prajakta Mali : प्राजक्ता माळी सातत्याने चर्चेत येत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने रसिकांना चांगलीच भुरळ घातली आहे.

प्राजक्ता माळी सातत्याने चर्चेत येत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे.

प्राजक्ताचे चाहते तिच्या लव्हलाइफबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अनेकदा प्राजक्ता याबद्दल मोकळेपणाने बोलतानाही दिसते.

एका मुलाखतीत प्राजक्ता माळीने अभिनेता वैभव तत्त्ववादीवर तिचं क्रश असल्याचं म्हटलं होतं. ती म्हणाली होती की, एकेकाळी अभिनेता वैभव तत्त्ववादी हा माझा क्रश होता. मी एकदा आईला हा तुला जावई म्हणून चालेल का, असं देखील विचारलं होतं.

'कॉफी आणि बरंच काही’ नंतर तो माझा क्रश होता. पण आता त्याच्याबरोबर लंडनमध्ये मी एका चित्रपटाच्या शूटींगसाठी गेले होते. त्यावेळी आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो. मी त्याला शूटींगदरम्यान कधीच याबद्दल सांगितलं नाही. पण एकत्र काम केल्यामुळे आता त्याच्यावर तसा क्रश राहिलेला नाही, असेही ती म्हणाली होती.

वैभव तत्ववादीला याबद्दल विचारलं असता तो म्हणाला की, तुम्ही तो व्हिडीओ नीट पाहिला नाही, असं वाटतंय मला. त्यात ती म्हणालीये की, 'कॉफी आणि बरंच काही रिलीज झाल्यानंतर मी आईला म्हटलेलं आई तुला हा चालेल का जावई म्हणून.''

तो पुढे म्हणाली की, ''ती ना माझ्याकडे कधी बातमी आली, ना तिची आई माझ्याकडे आली, असं काहीच झालं नाही.''

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात पाहायला मिळते आहे. ती या शोचं ती सूत्रसंचालन करते.

सिनेमाबद्दल सांगायचं तर शेवटची ती चिकी चिकी बुबूम बूम सिनेमात पाहायला मिळाली. त्या आधी ती फुलवंती सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने मुख्य भूमिकेत काम केले आणि या चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.