पेस्टल ग्रीन साडी, हलकासा मेकअप; दिप्ती देवीच्या नॅच्युरल लूक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:38 IST2024-01-29T13:32:07+5:302024-01-29T13:38:13+5:30

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे म्हणजे दिप्ती देवी.हिंदी व मराठी मालिकांमधून घराघरात पोहचलेल्या दिप्तीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
आजवरच्या कारकिर्दीत दिप्तीने नाळ, कंडिशन्स अप्लाय', मंत्र यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
दिप्तीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता अफाट आहे.
शांत पण तितकीच स्पष्टवक्ती या स्वभावामुळे दिप्ती कायम चर्चेत येत असते. मात्र, यावेळी ती तिच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
दिप्ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे कायमच तिच्या पोस्टची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होते.
अलिकडेच तिने एक फोटोशूट केलं असून त्यातील काही निवडक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.