आता कुठे आहे 'पक पक पकाक'मधली साळू? लूक इतका बदलला की ओळखताच येणार नाही
By देवेंद्र जाधव | Updated: July 22, 2025 13:42 IST2025-07-22T13:23:46+5:302025-07-22T13:42:39+5:30
'पक पक पकाक'मधली चिखलूची लाडकी साळू सर्वांच्या मनात घर करुन बसली. साळूची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंतर मराठी इंडस्ट्रीतून गायबच झाली. आता काय करते ती?

'पक पक पकाक' सिनेमा चांगलाच गाजला. २००५ साली हा सिनेमा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडला. याच सिनेमातील साळूची भूमिका चांगलीच गाजली
चिखलूवर प्रेम करणारी, त्याची काळजी घेणारी साळू अभिनेत्री नारायणी शास्त्रीने साकारली. या सिनेमानंतर साळू अर्थात नारायणी मराठी सिनेमात इतकी दिसली नाही
नारायणी शास्त्रीने नंतर मराठी इंडस्ट्रीनंतर हिंदी टेलिव्हिजनची वाट धरली. क्योकी साँस भी कभी बहू खी, कुसुम अशा गाजलेल्या मालिकांमध्ये नारायणी झळकली
रिश्तो का चक्रव्यूह मालिकेत नारायणीने साकारलेली पॉवरफूल बिझनेसमनची भूमिका चांगलीच गाजली. नारायणीला या भूमिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली
नारायणी सोशल मीडियावर विविध अंदाजात फोटोशूट करताना दिसते. धारदार नजर आणि बोल्ड अदा असलेले नारायणीचे फोटो चांगलेच व्हायरल होत असतात
नारायणी अभिनेता गौरव चोप्रासोबत रिलेशनशीपमध्ये होती. या दोघांनी नच बलिएमध्ये भाग घेतलेला. पण २०१५ मध्ये नारायणीने स्टीव्हन ग्रॅव्हर नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं
नारायणी 'पक पक पकाक'नंतर मराठी सिनेमात इतकी रमली नाही. पण हिंदी इंडस्ट्रीत विविध भूमिका करुन तिने स्वतःची ओळख मिळवली