Navratri 2021: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी पिवळ्या रंगात न्हाऊन निघाल्या मराठी तारका, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 12:33 PM2021-10-07T12:33:24+5:302021-10-07T12:49:42+5:30

Navratri 2021: आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झलीये. नवरात्रोत्सवात रंगांचे महत्त्व असते. आजचा रंग पिवळा... आज पहिल्या दिवशी पिवळा रंग असल्याने त्या रंगात खास फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने पिवळ्या रंगाच्या साडीतील एक सुंदर फोटो शेअर करत, चाहत्यांना शारदीय नवरात्रोत्सव व घटस्थापनेच्या (Ghatasthapana 2021) शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो -इन्स्टाग्राम)

ऋतुजा बागवे पिवळ्या रंगाच्या नऊवारीत झक्कास फोटोशूट केली आहे. (फोटो -इन्स्टाग्राम)

जुई गडकरी हिनेही खास फोटोशूट केलं आहे. पिवळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य आणखीच खुलून आलं आहे. (फोटो -इन्स्टाग्राम)

राजेश्वरी खरात हिचा लुक सगळ्यात भारी म्हणता येईल. तिचा रॉयल लुक पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडले आहेत. (फोटो -इन्स्टाग्राम)

अभिनेत्री रश्मी अनपट हिची अदाच न्यारी.. पिवळ्या रंगाची साडी आणि भरगच्च दागिण्यांमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय. (फोटो -इन्स्टाग्राम)

अभिनेत्री श्वेता शिंदे हिने पिवळ्या रंगाच्या घागरा-चोलीत ब्राईडल थीम फोटोशूट केलं आहे.(फोटो -इन्स्टाग्राम)

अस्मिता देशमुख हिने पिवळ्या रंगाच्या साडीत क्लासी फोटोशूट केलं आहे. (फोटो -इन्स्टाग्राम)

अश्विनी महांगडे हिनेही पिवळ्या रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे. (फोटो -इन्स्टाग्राम)