'मी प्रेमिका...' तेजस्विनीची लक्षवेधी पोस्ट, अभिनेत्रीच्या सौंदर्याला तर तोडच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 04:36 PM2024-03-28T16:36:01+5:302024-03-28T16:43:51+5:30

तेजस्विनी पंडित हे नाव मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर येतं.

अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

दमदार अभिनयाबरोबरच तेजस्विनीने आपल्या निखळ सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली.

तेजस्विनी तिच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठीदेखील ओळखली जाते.

समाजातील अनेक मुद्द्यांवर ती अगदी परखडपणे तिचं मत मांडताना दिसते. अभिनेत्री सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

सोशल मीडियावर तिची तगडी फॅन फॉलोइंगही पाहायला मिळते.सध्या तेजस्विनीने सोशल मीडियावर तिचा शेअर केलेला फोटो चर्चेत आलाय. निळ्या रंगाच्या पैठणी साडीत अभिनेत्री फारच सुंदर दिसतेय.

'बांबू' हा तिचा पहिलाच निर्मित चित्रपट आहे. तेजस्विनी 'तू ही रे', 'येरे येरे पैसा', 'अगं बाई अरेच्चा', 'फॉरेनची पाटलीण' या चित्रपटांत झळकली.

'मी सिंधुताई सकपाळ' या चित्रपटातील तिच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं होतं.