बहीण-भावाची भूमिका साकारणारे 'हे' कलाकार आहेत खऱ्या आयुष्यात पती-पत्नी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 01:53 PM2021-09-30T13:53:39+5:302021-09-30T14:05:25+5:30

Marathi celebrity: मराठी कलाविश्वात असे असंख्य कलाकार आहेत जे अनेकदा त्यांच्या अभिनयासोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतात.

मराठी कलाविश्वात असे असंख्य कलाकार आहेत जे अनेकदा त्यांच्या अभिनयासोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतात. त्यामुळेच आज आपण कलाविश्वातील अशा काही जोड्या पाहणार आहोत ज्या खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असूनही पडद्यावर त्यांनी बहीण-भावाची भूमिका साकारली आहे.

पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे - मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे.

खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जोडीदार असलेल्या या दोन्ही कलाकारांनी काही नाटक, चित्रपटांमध्ये बहीण-भावाची भूमिका साकारली आहे.

'विहीर' या चित्रपटात त्यांनी बहीण-भावाची भूमिका साकारली होती. तसचं एका नाटकातही ते भावंडाच्या रुपात झळकले होते.

सुव्रत जोशी आणि सखी गोखले - 'आठशे खिडक्या, नऊशे दारं', 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेमध्ये या दोघांनी रुममेट्सची भूमिका साकारली होती.

त्यात दिल दोस्ती दुनियादारीमध्ये ते एकमेकांना बहीण-भाऊ मानत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

सखी आणि सुव्रत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. सखी अलिकडेच गोदावरी या चित्रपटात झळकली होती. तर सुव्रतही छुमंतर या चित्रपटात झळकला आहे.