घटस्फोट, प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत अफेअरच्या चर्चा; पुन्हा लग्न करण्यावर स्पष्टच बोललेली तेजस्विनी पंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 13:43 IST2025-05-23T13:36:45+5:302025-05-23T13:43:47+5:30

तेजस्विनी आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज ती फक्त अभिनेत्रीच नाही तर निर्माती म्हणूनही यशस्वी झाली आहे.

तेजस्विनीने नुकत्याच रिलीज झालेल्या 'येक नंबर' सिनेमाची निर्मिती केली. त्याआधी तिने 'अथांग'या मालिकेचीही निर्मिती केली होती.

वैयक्तिक आयुष्यात तेजस्विनीचा एकदा घटस्फोट झाला आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीत लग्नावर भाष्यही केलं होतं.

तेजस्विनीने २०१२ साली तिच्या लहानपणीचा मित्राशीच लग्नगाठ बांधली होती. भूषण बोपचे असं त्याचं नाव होतं. उद्योगपती रामेश्वर बोपचे यांचा तो मुलगा होता.

तेजस्विनी आणि भूषण एकमेकांचे चांगले मित्र होते. मात्र नवरा बायको म्हणून त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. काही वर्षाच तिने घटस्फोट घेतला.

पुन्हा लग्न करणार का? यावर तेजस्विनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती की, "'मी सेटल आहे. कुणाशीही लग्न करणं किंवा आयुष्यात पुरुष असणं हे म्हणजे सेटलं होणं नाही. मी माझ्या कुटुंबाला सांभाळते. मी काम करतेय. मी अभिनय करतेय. मी निर्माती आहे आणि सर्व मजेत सुरु आहे. यासाठी मला कोणत्याही पुरुषाच्या पावतीची गरज नाही."

तेजस्विनीचं नाव दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. त्यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तिने बाजू मांडली होती. 'जिथे मी त्याला दादा म्हणते तिथेच माझ्यासाठी सगळं संपतं. मला उत्तर द्यायची पण गरज नाहीये."

"आपल्याला जेव्हा माहीत असतं की समोरची व्यक्ती आपल्या बापारुपी किंवा दादारूपी आहे. तिथे वेगळे विचार काय येणार' असं ती म्हणाली होती.