सिद्धार्थ चांदेकरसह 'हे' मराठी कलाकार विकतात दिवाळीचा फराळ; एका अभिनेत्रीच्या फराळाला आहे विदेशात मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 03:55 PM2023-11-08T15:55:28+5:302023-11-08T16:03:40+5:30

Marathi celebrity: सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ विकायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मराठी कलाविश्वात असे काही कलाकार आहेत जे दिवाळीत फराळ विकतात.

'सुंदरा मनामध्ये भरली' या गाजलेल्या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक.

काही महिन्यांपूर्वीच अक्षयाने कल्चर किचन या नावाने एक छोटा फूड स्टार्टअप सुरु केला आहे.

यंदा दिवाळीमध्ये अक्षयाने खवय्यांसाठी खास दिवाळीचा फराळ आणला आहे. यात तिच्या साजूक तुपातील लाडू, नाचणी ड्रायफ्रूट्स लाडूचे गुळातील लाडू आणि मूगडाळीची चकली यांना विशेष मागणी आहे.

लोकप्रिय अभिनेत्री किशोरी गोडबोले तर साऱ्यांनाच ठावूक आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून किशोरी यांचं दादारमध्ये गोडबोले स्टोअर्स हे दुकान आहे.

दरवर्षी त्या दिवाळीत फराळाचे पदार्थ विकतात. विशेष म्हणज विदेशातही त्यांच्या फराळाला मोठी मागणी आहे.

त्यांचा हा व्यवसाय वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल करतो.

लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्या आईविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. सीमा चांदेकर प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांचा स्वत:चा व्यवसायदेखील आहे.

सीमा फूड्स असं त्यांच्या बिझनेसचं नाव असून त्या घरगुती पदार्थ विकतात.

सीमा चांदेकर दिवाळीमध्ये फराळ तयार करुन तोदेखील विकतात.