ठामपणे भूमिका मांडणाऱ्या हेमांगी कवीच्या नवऱ्याविषयी माहितीये का? पाहा कोणत्या क्षेत्रात आहे कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 12:22 PM2022-03-23T12:22:33+5:302022-03-23T12:35:07+5:30

Hemangi kavi: हेमांगीने आतापर्यंत बऱ्याचदा तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र, तिच्या नवऱ्याविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे.

स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक भूमिका मांडण्यामुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.

उत्तम अभिनयशैलीसोबतच हेमांगी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत येत असते.

समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर हेमांगी बिंधास्त आणि निर्भीडपणे व्यक्त होते.

हेमांगी अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफविषयीदेखील चाहत्यांना अपडेट देत असते.

हेमांगीने आतापर्यंत बऱ्याचदा तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. मात्र, तिच्या नवऱ्याविषयी फार मोजक्या लोकांना माहित आहे.

हेमांगीच्या नवऱ्याचं नाव संदिप धुमाळ असं असून तो सिनेमॅटोग्राफर आहे.

हेमांगी आणि संदिपचं लव्हमॅरेज असून त्यांच्या लग्नाला १३-१४ वर्ष उलटून गेली आहेत.

एका चित्रपटाच्या सेटवर हेमांगी आणि संदिपची पहिली ओळख झाली होती आणि या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं.

संदिप अत्यंत मितभाषी असून शांत स्वभावाचा असल्याचं सांगण्यात येतं.