भूषण प्रधानच्या डॅशिंग अंदाजावर तरुणी घायाळ; फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 12:53 PM2024-01-09T12:53:43+5:302024-01-09T12:56:44+5:30

Bhushan pradhan: भूषण आज अनेक तरुणींचा क्रश आहे. त्यामुळे त्याच्या प्रत्येक फोटोवर फिमेल फॅन्सच्या कमेंट सर्वात जास्त असतात.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे भूषण प्रधान

उत्तम अभिनयशैली आणि स्मार्ट पर्सनालिटी यांच्या जोरावर भूषणने अनेक तरुणींची मन जिंकली आहेत.

आज भूषणची तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी वाट्टेल ते प्रयत्न करत असतात.

भूषण सुद्धा त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम प्रयत्न करतो. त्यामुळे तो नवनवीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो.

अलिकडेच भूषणने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तो कमालीची हॉट दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.

भूषणने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात पिंजरा ही त्याची मालिका विशेष गाजली होती.

भूषणने कॉफी आणि बरंच काही', 'निवडुंग', 'मिसमॅच' यांसारख्या चित्रपटांमधून त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.